सध्या बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे आणि आयरा खानच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. आयराने सोशल मीडियावरही केळवणाचे फोटो शेअर केले. केळवणासाठी आयरा आणि नुपूर दोघेही खूप सुंदर दिसत होते. नुपूरने कुर्ता घातला होता तर आयराने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. आयराने नाकात नथ आणि चंद्रकोर लावून मराठमोळा लूक केला होता. आयराच्या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकरदेखील उपस्थित होती. त्याचसोबत घरातील इतर सदस्य उपस्थित होते.
आमिर खानची लाडकी लेक आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत आयरा आणि नुपूर यांनी ३ जानेवारी रोजी ६ च्या सुमारास मुंबई येथील ताज लँडमध्ये रजिस्टर लग्न केलं. आयरा खानने नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधली असून ती आता महाराष्ट्राची सून झाली आहे. त्यांच्या या विवाह सोहळ्यासाठी अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र कोर्ट मॅरीजवेळी नुपूरच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याने हाफ पॅन्ट आणि टी-शर्टमध्ये घरातून आठ किलोमीटर लग्नस्थळी धावत येऊन आयरा सोबत लग्न केले होते.
आयरा खान व नुपूर यांच डेस्टिनेशन वेडिंग ८ ते १० जानेवारी दरम्यान उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये होणार असून त्यांचा मित्र परिवार व कुटुंबातील सदस्य लग्नाच्या ठिकाणी पोहचले आहेत. लगीन सराईतील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच आमिरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याची दुसरी पत्नी किरण रावसह जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत आमिर ‘ठरकी छोकरो’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्याबरोबर पत्नी किरण राव देखील थिरकताना दिसत आहे. आमिरचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चर्चेत आला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील चांगलीच पसंती दाखवली आहे. काहींनी त्या व्हिडीओवर “पीके स्टाइल डान्सिंग.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “पीके आहेस का?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “पीकेच्या जगातील लग्न” तर सध्या सोशल मीडियावर आशाच कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
View this post on Instagram
तसेच ८ जानेवारीला आयराचा मेहंदी सोहळा होणार असून उदयपूरच्या स्थायिक महिला आयराला मेहंदी काढणार आहेत. त्यानंतर ९ जानेवारीला मेवाड लॉनमध्ये संगीत सोहळा रंगणार आहे आणि १० जानेवारीला मयूर बागमध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे.