‘कॉफी विथ करण ७’च्या नव्या पर्वाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. कारण या शोमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा कलाकार हा वेगवेगळ्या गुपितांचा आणि गंमती-जमतीचा उपहार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.
सध्या कॉफी विथ करणच्या येणाऱ्या नवीन भागामध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे तसेच संजय कपूरची पत्नी महीप कपूर हजेरी लावताना दिसणार आहे. यावेळी भावना, महीपसह गौरी तिच्या खासगी आयुष्याबाबत काही खुलासे करणार आहे.
सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी म्हणून गौरी खान ही देखील बरीच चर्चेत असते. शो दरम्यान दिग्दर्शक आणि शोचा सुत्रसंचालक करण जोहरने तिला तिच्या खासगी आयुष्यासोबतच कामाबाबतही काही प्रश्न विचारले. यावेळी गौरीने आपल्याला बऱ्याचदा काम मिळत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
View this post on Instagram
गौरीने देखील तिच्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे. ती स्वतः इंटिरियर डिझायनर आहे. तिने तिच्या घराचे इंटिरियर सुध्दा स्वतःच डिझाइन केले आहे. सुपरस्टारची पत्नी असूनही आपली आवड जोपासण्यासाठी आणि आपल्या करिअर मध्ये अधिकाधिक प्रगती करण्यासाठी ती आजही काम करत आहे. परंतू आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाता आलं नसल्याची गौरीला खंत आहे. अनेकवेळा शाहरुख खानची पत्नी म्हणूनच तिच्याकडे लोक पाहतात हे तिला खटकत आहे. शिवाय यामुळे तिला काम देखील मिळत नसल्याचं गौरीने म्हंटले आहे.
तसेच गौरी म्हणाली की, “जेव्हा कामासाठी मी एखाद्या व्यक्तीला भेटते तेव्हा काहीच लोक इंटिरियर डिझायनर म्हणून माझ्याकडे पाहतात. बऱ्याचदा असं होतं की माझ्याकडे कामच नसतं. कारण मी शाहरुख खानची पत्नी आहे. मी शाहरुख खानची पत्नी आहे म्हणून लोक मला काम देत नाहीत.” यावरून गौरीला तिच्या आयुष्यात आणि तिच्या क्षेत्रामध्ये खूप काम करायचे आहे हे निदर्शनास येते.
एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असल्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत असं गौरी खानचे म्हणणे आहे. तसेच तिला आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची देखील इच्छा आहे. अजूनही ती त्यासाठी खूप मेहनत घेते. तसेच नवनवीन काम मिळवण्यासाठी धडपड करत असते. हे तिच्या बोलण्यामधूनही स्पष्टपणे दिसत होते.