सध्या मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूडमध्ये लपून-छपून कोणाला कसलीही खबर न लागू देता लग्न करणे हे काही नवीन नाही. फार कमी बॉलिवूड कलाकार आपल्या लग्नाची आधीच अधिकृत घोषणा करताना दिसून येतात. तसेच प्रत्येकाच्या लग्नात काही ना काही खास असतेच. आजकाल डेस्टिनेशन वेडिंग आणि लग्नात पेस्टल रंगाचे कपडे हा एक ट्रेंडच झाला आहे. याची सुरुवात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केली होती. अशातच बॉलिवूडमधील आणखीन एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणावत (Kangna Ranaut). कंगना नेहमीच तिच्या उत्तम अभिनयामुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. कंगनाचा अभिनय तर उत्तम आहेच, पण तिचं सौंदर्य देखील तितकंच सुंदर आहे. कंगणाचे आत्तापर्यंत अनेक सिनेमे हिट झाले आहेत. ती कोणत्याही विषयावर नेहमीच कोणाचीही भीती न बाळगता स्पष्ट बोलताना दिसते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
तर आता कंगना राणावत लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंगना लग्न करत असल्याची पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये कंगना लवकरच लग्न करणार आहे आणि तिने तिचा लग्नाचा ड्रेस देखील शिवायला दिला आहे, असं सांगण्यात आले. तिने इंडस्ट्रीमधीलच एका डिझायनरकडे तिचा ड्रेस दिला आहे, असं देखील त्या पोस्ट मध्ये दिले होते. पण काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. पण कंगना नक्की कोणासोबत लग्न करणार आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
या आधी देखील अनेकदा कंगनाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, पण तिने नेहमीच या सगळ्या चर्चांना पुर्णविराम लावला होता. काही दिवसांपूर्वी कंगना अयोध्येला राम मंदिराच्या उद्घाटनाला पोहोचली होती. त्यावेळी तिने ‘ईजि माय ट्रीप’चे कॉ – फाउंडर निशांत पिट्टी याच्या सोबतचे फोटो शेअर केले होते. त्यावेळी ती निशांतला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र कंगनाने तिच्या सोशल मीडियावर याबाबत भाष्य केले, तेव्हा ती म्हणाली की, “माझी मीडियाला नम्र विनंती आहे की, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांतजी विवाहित आहेत आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करीत आहे. योग्य वेळ आल्यावर मी त्याबद्दल सांगेन. एका महिलेनं एखाद्या पुरुषाबरोबर फोटो काढल्यानं रोज तिचं नाव एखाद्या नवीन पुरुषाशी जोडणं योग्य नाही.”
त्यानंतर कंगना एका परदेशी व्यक्ती सोबत हातात हात घालून फिरताना दिसून आली होती. मात्र कायम स्पष्ट बोलणाऱ्या कंगनाने काहीच भाष्य केलेले नाही. त्यामुळे आता कंगना नक्की कोणासोबत लग्न करणार आहे, याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.