धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत . इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे त्यांना अॅक्शन हीरो म्हणून देखील ओळखले जाते. धर्मेन्द्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ ला झाला त्यांचे जन्मस्थान हे पंजाब मधील लुधियाना या जिल्ह्यातील नरसाली या छोट्या खेडगावामधील आहे.
सिनेसृष्टीतून काही काळ लांब राहिल्यानंतर ते आता ओटीटी माध्यमाकडे वळताना दिसत आहे. कोरोना काळामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी ओटीटी माध्यमात पधार्पण केले. बॉलिवूडमध्ये हीमॅन अशी ओळख असणारे पंजाबचा पुत्तर धर्मपाजी अर्थात धर्मेंद्रजी वयाच्या ८७व्या वर्षी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
त्यांची ही वेबसीरिज ऐतिहासिक असून यात मुघल काळ दाखवण्यात येणार आहे. धर्मेंद्र सोबत या वेबसीरिजमध्ये अदिती राव हैदरी, शुभम कुमार मेहरा, आशिम गुलाटी आदी कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे यातील त्यांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ असे या वेबसीरीजचे नाव आहे. विशेष म्हणजे यात मराठमोळा अभिनेता सुबोध भावे देखील काम करणार आहे. धर्मेंद्रने या वेबसिरीज मधील त्यांच्या लूकची पोस्ट त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे
Friends, i am playing Shaikh Slim Chishti ….a sufi saint, in film Taaj. A small but an important role………need your good wishes 🙏 pic.twitter.com/IQpAoaS67y
— Dharmendra Deol (@aapkadharam) February 15, 2023
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे “मित्रांनो, मी शेख स्लिम चिश्ती या सुफी संतांची भूमिका आगामी ताज या मालिकेत करणार आहे. भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची आहे. तुमच्या शुभेच्यांची गरज आहे.” या शब्दात त्यांनी आपल्या आगामी वेबसिरीजची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.