सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे. कलाकार वर्ग हा कायम आपल्या चाहत्यांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांमधील अंतर कमी झाले असले, तरी सोशल मीडियामुळे कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कलाकारांचे फेक अकाऊंट बनवण्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. असाच काही प्रकार लोकप्रिय अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांच्या सोबत घडला आहे.
View this post on Instagram
डॉ.अमोल कोल्हे यांचे सुद्धा फेक अकाऊंट तयार करण्यात आले असून अमोल कोल्हे यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली.
एवढेच नव्हे तर या फेक अकाऊंट वरुन लोकांकडे पैशांची मागणी करणारे मेसेज सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे.
अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे की, त्यांच्या वेरिफाइड इंस्टाग्राम अकाऊंटच युजरनेम ‘@amolrkolhe’असं आहे. तर ‘@kdr.amol’ या फेक अकाऊंट वरून आलेल्या कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये.