केवळ मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही उत्तम कामगिरी करत ‘Sai Tamhankar‘ ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. फारच कमी काळात ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. तर या ग्लॅमरस अभिनेत्रीने अनेक फॅशन ट्रेंड्स देखील दिले आहेत.
सई सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे ती प्रेक्षकांना कायमच जवळची वाटते. ती कायमच तिच्या निरनिराळ्या स्टाईलमुळे आणि सिनेमांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
आज पुन्हा एकदा सई चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. Sai Tamhankar सहसा तिचं खासगी आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवते. पण आता सईने तिच्या इंस्टाग्रामवरुन नुकताच एक खास फोटो शेअर केला आहे.
सईने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती तिच्या एका खास व्यक्तीसोबत दिसत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे निर्माता अनिश जोग. सईने अनिश जोग याच्या सोबतचा खूपच सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, “मला तुझी आठवण येत आहे.” तर तिची ही स्टोरी पुन्हा शेअर करत अनिश ने लिहिले की, मला सुद्धा तुझी आठवण येत आहे आणि मला तुझ्या मिठीची गरज आहे.”
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. सई आणि अनिश हे एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. याआधी देखील त्यांच्यातील नात्याची चर्चा सुरू होती. परंतू अद्यापही त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केला नाही.
परंतू सई आता लवकरच लग्नबंधनात अडकणार का? या चर्चांना उधाण आले आहे.