लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंह हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हनी सिंह बराच चर्चेत होता. हनीवर त्याची पत्नी शालिनी तलवार हिने २०२१ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर देखील आरोप केले होते. हनी सिंहने तिची फसवणूक केली असल्याचे तिने सांगितले. व त्याचबरोबर मानसिक छळाचा देखील आरोप केला आहे.
हा सर्व वाद संपवण्यासाठी त्यांच्यात एक करार झाला. त्या करारानंतर त्याच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा खटला मागे घेतला. जवळपास १३ वर्षाच्या संसारानंतर हनी सिंहने पत्नी शालिनी तलवार पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षापासून त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू असून कोर्टाने हनी सिंहला त्यांच्या नात्यास एक संधी देण्यास सांगितले होते, तेव्हा त्याने अस म्हंटल की, आता शालिनीसोबत राहण्यात काहीच अर्थ नाही.
हनी व शालिनी यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. हे दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. लग्नाआधी गेली २० वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा घाट घातला व २०११ ला ते दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची बातमी कोणालाही माहिती नव्हती. हनी सिंहने एक रिअलिटी शो दरम्यान त्यांच्या लग्नाची गुड न्युज सर्वांना दिली होती. दोघांमध्ये सर्व काही ठीक चालले असताना शालिनीने अचानक हनीवर मारहाणीचा आरोप केला व त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
जवळपास अडीच वर्षापूर्वी घटस्फोटासाठीचा अर्ज देण्यात आला होता. ७ नोव्हेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने हनी सिंह आणि त्यांची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आता या दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले असून आता दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. मात्र शालिनीला पोटगी म्हणून कोट्यावधी रुपयाची किंमत हनीला मोजावी लागणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंह आणि शालिनी तलवार यांनी घटस्फोटादरम्यान एकमेकांवर केलेले सर्व आरोप मागे घेतले आहेत. शालिनीने हनी सिंगकडून पोटगीसाठी १० कोटी रुपये मागितले होते. आता ही रक्कम एक कोटीवर आली आहे. या रकमेबाबत दोघांमध्ये करार झाला आहे. आता हनी सिंह पत्नीला एक कोटी पोटगी म्हणून देणार असल्याचे बोलले जात आहे.