जान्हवी कपूर ही सध्या बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. जान्हवीचे केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथमध्येही लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नाव गाजवून आता ती साऊथमध्ये देखील आपली छाप पाडायला तयार झाली आहे. जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
दिग्दर्शक कोराताला शिवच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरची हिरोईन म्हणून झळकणार आहे. जान्हवी आता थेट ज्युनियर एनटीआर सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या बहुप्रतिक्षित NTR 30 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर सोबतच अनेक प्रसिद्ध कलाकार या सिनेमाचा भाग असणार आहेत. 18 मार्च 2023 पासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
दरम्यान, ज्युनियर एनटीआर सोबत काम करण हे जान्हवीच स्वप्न होत अस जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले आहे. पुढे जान्हवी म्हणाली, “ ज्युनियर एनटीआरचा ‘आरआरआर’ हा चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहिला आहे. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असेल. ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्यासाठी मी रोज प्रार्थना करत होती आणि अखेर माझे हे स्वप्न पूर्ण होत आहे.”
“मला एनटीआर सरांसोबत काम करायचे आहे. या चित्रपटात मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे. मी नेहमी सकारात्मक राहायला आणि माझे काम करायला शिकली आहे.” अस जान्हवी म्हणाली.
यावर्षी जान्हवी ‘बावल’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.