महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात. हिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटात स्वत:च्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून वनिता खरातकडे पाहिले जाते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामूळेही चर्चेत असते. वनिता खरात व सुमित लोंढे २ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. ते त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत. वनिता सोशल मीडियावर देखील सक्रीय असते.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती कायमच चर्चेत असते. वनिता नुकतीच सरला एक कोटी या चीत्रपटात झळकली होती. या चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने व अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून याचे दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी केलं होतं.
सध्या सोशल मीडीयाचा वापर खूपच वाढला आहे. हिंदीप्रमाणे मराठी सेलेब्रिटी देखील सोशल मिडियावर सक्रीय असतात. बऱ्याचवेळा काही कलाकारांना सोशल मिडियावर ट्रोल केले जाते. यावर नुकतेच वनिता खरात ने भाष्य केले आहे. ती असं म्हणाली, “मला अजिबात ट्रोलिंगचा त्रास होत नाही. मी एकदा पोस्ट शेअर केली की त्याकडे पुन्हा बघत देखील नाही. त्यावर किती लाईक्स कमेंट्स आल्या हे बघत नाही.”
View this post on Instagram
“कोणी काय कमेंट केली आहे हे बघत नसल्याने मला फरक पडत नाही. मला माहिती आहे मी केलेली गोष्ट बरोबर आहे त्याच्यावर इतरांचं मत जाणून घेणं मला आवश्यक वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली.