01
of 10
१३ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेल्या अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांनी त्यांचे सर्व शिक्षण ठाण्यातच पूर्ण केले.
01
of 10
02
of 10
इयत्ता आठवीत असताना कविता यांनी पैलतीर या मराठी मालिकेत बालकलाकार म्हणून काम केले.
02
of 10
03
of 10
‘घायाळ’ या मराठी सिनेमातून कविता लाड यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
03
of 10
04
of 10
चार दिवस प्रेमाचे, हवास मज तू, शू कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांतून त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.
04
of 10
05
of 10
प्रशांत दामले यांच्या सोबत रंगभूमीवर एकत्र काम करत कविता लाड यांनी अनेक नाटके गाजवली.
05
of 10
06
of 10
कॉमेडी डॉट कॉम, काय पाहिलंस माझ्यात, चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांतून कविता घराघरांत पोहोचल्या.
06
of 10
07
of 10
तुमचं आमचं सेम असतं, लपून छपून, अनोखी हे घर माझे, तू तिथे मी, जिगर, गर्लफ्रेंड या सिनेमांमधून त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे मन जिंकले.
07
of 10
08
of 10
आता सध्या सुरु असलेल्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
08
of 10
09
of 10
कविता लाड यांनी २००३ साली आशिष मेढेकर यांच्याशी लग्नगाठ बांधली.
09
of 10
10
of 10
कविता आणि आशिष यांना ईशान हा मुलगा आणि सनाया ही मुलगी आहे.
10
of 10