कलाकार हा नेहमी उस्फुर्त, उत्तुंग आणि एकदम दिलखुलास असा कायम असतोच. सर्वांच्या आसपास तो नेहमी तसाच वावरतही असतो. त्याच्या कलेचं सर्वजण कौतुक करतातच पण कलाकाराचं दुःख मात्र बाजूलाच राहतं आणि त्याच्या दुःखाच्या वेळी सुद्धा तो एकटा पडलेला दिसून येतो. असचं काहीस झालयं मानसी नाईक सोबत, मानसीने तिच्या लग्नाचे फोटो, तिच्या सासरचे खरेरा आडनाव सोशल मिडीयावरून काढून टाकले आहे. एवढेच काय तर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ती नेहमीच तिचे व्हिडीओ आणि पोटो आपल्या चाह्त्यांसोबत शेअर करत असते. यावेळी सुद्धा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत आणि त्याचे कॅप्शन मात्र आपल्याला संभ्रमात टाकणारे आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये ती तिच्या मांजरीसोबत दिसत आहे आणि ‘प्रेम में तोहरे ऐसी पडी मै’ या गाण्यावर तिचे हाव भाव व्यक्त करते आहे. सोबत तिचे कॅप्शन आहे की “समजदारी ज़िन्दगी को बेरंग कर देती है” आता नेमक असं काय झालयं की तिला समजूतदारपणावर अस बोलावसं वाटतं आहे. तिच्या मनातील भावनांचा आपण वेध घेऊ शकत नसलो तरी तिचे व्हिडीओतील हावभाव कमालीचे लक्षवेधी आहेत. मानसीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर तिच्या चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या डोळ्यांच्या अदांचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. तिच्या पेहरावाविषयी बोलतांना सुद्धा ती खूप सुंदर दिसत आहे असे चाहते म्हणत आहेत.