बाळ कोणाचही असो श्रीमंत अथवा गरीब. प्रत्येक आईवडिलांना आपल्या बाळाची काळजी असते. मग ती काळजी त्याच्या आरोग्याविषयी असो की त्याच्या सुरक्षेविषयी. पण जर मूल एखाद्या सेलिब्रिटीच असेल तर ते आपल्या मुलाबाबत अधिकच सजग असतात, त्यासाठी त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात. असच काही नवीन आईवडील झालेल्या आलिया आणि रणबीरच्या बाबतीत झाले आहे. त्यांनी आपल्या लेकीसाठी काही निर्णय घेतले आहेत.
रविवारी ६ नोव्हेंबर रोजी बॉलीवूड मधील कपूर आणि भट कुटुंबात एका गोंडस परीच आगमन झालं, आलिया आणि रणबीर यांना कन्यारत्न प्राप्त झालं. बाळाच्या या गोड बातमी नंतर या सेलिब्रिटी जोडीवर आनंदाचा वर्षाव झाला. मात्र सगळ्यांना उत्सुकता होती ती बाळाचा चेहरा पाहण्यासाठी.
पण रणबीर आलिया याबाबतीत खूप सजग होते त्यांनी त्यांच्या बाळाच्या सुरक्षेसाठी कुणालाही बाळाचा चेहरा दिसणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली. लेकीच्या सुरक्षेसाठी त्यांनी काही निर्णय सुद्धा घेतले आहेत. तर आपण जाणून घेऊयात आलिया आणि रणबीर यांनी आपल्या बाळाला भेटायला येणाऱ्या कुटुंबियांसाठी व मित्र मैत्रिणींसाठी काय निर्णय जाहीर केला आहे.
बाळाला भेटायला येणाऱ्या मित्रमंडळींना बाळाचे फोटो काढण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच जर कोणी फोटो घेतले तर ते सोशल मीडियावर न टाकण्याची विनंती त्यांनी केली आहे. बाळ लहान असल्या कारणामुळे बाळाला भेटायला येणाऱ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव यायला हवी. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाच पालन त्यांच्या घरच्यांबरोबर त्यांच्या मित्रमंडळींनाही करावे लागणार आहे.
रणबीर आलियाने लेकीच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे सध्या तरी त्यांच्या चाहत्यांना बाळाचा चेहरा बघायला मिळणार नाही असे दिसते.