दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल स्थान मजबूत बनवले आहे. अनेक बॉलिवूडचे कलाकार त्याच्या सोबत काम करण्यास उत्सुक असतात. ‘बाहुबली’ नंतर हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या चाहत्या वर्गाचा आकडा अधिक वाढला आहे. आत्ता लवकरच तो ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये दिसणार असून या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाला एका मराठी अभिनेत्याचा आवाज देण्यात आलं असून याआधी ‘बाहुबली’ या चित्रपटासाठी देखील त्याने डबिंग केली होती. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता देवदत्त नागे देखील एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
तसेच दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा देखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्या हिंदी डबसाठी मराठमोळा अभिनेता शरद केळकर याने प्रभासला त्याचा आवाज दिला आहे. त्यामुळे सध्या तो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये प्रभासने साकारलेल्या प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी शरद केळकर यांनी आवाज दिला असून यापूर्वी त्यांनी प्रभासच्या ‘बाहुबली’ या सिनेमासाठी डबिंग केलं होतं. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, “प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी डबिंग करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. दिग्दर्शक ओम राऊतला पहिल्या दिवसापासूनच ‘आदिपुरुष’ मधील प्रभासच्या भूमिकेसाठी माझा आवाज हवा होता. बहुबालीमधील माझ्या आवाजाला प्रेक्षकांनी एवढे वर्ष लक्षात ठेवले. आता यापुढे प्रेक्षक मला प्रभू श्री रामांच्या भूमिकेच्या आवाजासाठी लक्षात ठेवतील,”