काही वर्षांनंतर बॉलिवूडचा बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कधी सिनेमा तर कधी #AskSRK सेशन यामुळे सध्या त्याच्या चर्चा सुरूच आहेत. पठाणनंतर त्याच्या आगामी सिनेमासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
शाहरुखचे देशातच नाही तर संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. जेवढे चाहते शाहरुख खानवर प्रेम करतात तेवढच शाहरुखला देखील त्याच्या चाहत्यांबद्दल प्रेम आणि आदर वाटतो. त्यासाठी तो जमेल तेव्हा चाहत्यांशी संपर्क साधत असतो तर कधी चाहत्यांच्या इच्छाही पुर्ण करत असतो. आज मात्र शाहरुखच्या एका चाहत्यामुळे पुन्हा त्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पश्चिम बंगामधील शिवानी चक्रवर्ती या शाहरुखच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. त्या ६० वर्षांच्या असूनही त्यांना शाहरुखबद्दल आजही तेवढेच वेड आहे. परंतू दुर्दैवाने त्या सध्या कर्करोगाने ग्रासलेल्या आहेत. खरं तर त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. एवढ्या आजारपणातही त्यांनी शाहरुखचा नुकताच प्रदर्शित झालेला पठाण सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहिला.
View this post on Instagram
मृत्यू अटळ आहे, हे माहित असूनही त्या त्याकडे खूपच सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. शिवानी चक्रवर्ती यांनी शाहरुख खानला एकदा भेटण्याची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या मुलींनी सोशल मीडियावर शेअर केला. तसेच त्यामध्ये शाहरुखला देखील टॅग केले आहे.
हे देखील वाचा : आता थेट दक्षिण कोरियामध्ये सत्संग भरणार…
शिवानी चक्रवर्ती म्हणाल्या की, “डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की मी फार दिवस जगणार नाही. माझी एकच शेवटची इच्छा आहे की मरण्याआधी शाहरुख खानला भेटता यावं. मला त्याला प्रत्यक्षात बघायचं आहे. मी त्याला माझ्या हातचे बंगाली पदार्थ खाऊ घालू इच्छिते.”
आता शाहरुख खान त्याच्या या चाहतीची दाखल घेणार का? आणि शिवानी चक्रवर्ती यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.