मराठमोळी अभिनेत्री ‘सायली संजीव’ने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये काम केले. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात तिचं विशेष स्थान निर्माण केले आहे.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तिच्या या पहिल्या मालिकेला चाहत्यांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं होतं. तेव्हापासून ती खरी प्रसिद्धीच्या झोतात आली आणि आजही ती प्रत्येक टप्प्यावर तिच्या चाहत्यांचे मन जिंकत आहे.
सायली सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तसेच ती अनेक कारणांमुळे सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरते आहे. ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूकमधीले फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. बऱ्याचदा ती सालस, सोज्वळ लूकमध्ये दिसून येते. तिने शेअर केलेले सर्वच फोटो चाहत्यांना फारच आवडतात.
सायलीने मालिकांमध्ये काम करता करता अनेक सिनेमे देखील केले आहेत. तिचा ‘बस्ता’ हा सिनेमा चांगलाच गाजला असून ह्या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. ती मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम करते. ‘परफेक्ट पती’ ह्या तिच्या हिंदी मालिकेला देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तसेच तिने ‘झिम्मा’, ‘हरहर महादेव’, ‘उर्मी’, ‘दाह’, ‘मन फकीर’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले असून तिचा ‘गोष्ट एका पैठणीची’ ह्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सायली सध्या पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स करत असून तिने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने आता शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती देत सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले की, “शिकायचं कधी थांबवू नका.”
View this post on Instagram
या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देत कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.