सध्या बिग बॉस ओटीटी २च्या पर्वाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बिग बॉसच्या घरातील रोज नवनवीन गोष्टींचे अपडेटस् सोशल मीडियावर पाहायला मिळतात. घरातील सदस्यांना रोज वेगवेगळे टास्क दिले जातात. सगळेच टास्क पूर्ण करण्याचा ते प्रयत्न देखील करतात.
नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता. टास्क असा होता की, यामध्ये घरातील सर्व सदस्यांना १ ते ९ पर्यंत एकमेकांना रँकिंग द्यायची होती. प्रत्येकाने आपल्याला चांगली रँकिंग मिळावी म्हणून इतर स्पर्धकांशी मनधरणी करायची होती. पण पूजा भट्टने यासाठी साफ नकार दिला. ती स्वतःला रँकिंग देऊ शकत नसल्याचे तिने सांगितले.
जेव्हा पूजा भट्टने इतर घरातील सदस्यांना स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी पटवून द्यायची वेळ आली तेव्हा ती म्हणाली, “मी वूमन कार्ड खेळत नाही. मी थेट संवाद साधण्यावर विश्वास ठेवते, नजर मिळवून मी लोकांशी समोरासमोर बोलू शकते. इतक्या वर्षांच्या यशस्वी करिअरनंतर मला बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलं याचं कारण माझे मत आणि व्यक्तिमत्त्व आहे. मी नेहमी सूचनांचे पालन करते आणि अधिकारपदावर असलेल्या लोकांच्या आदेशांचा आदर करते.”
View this post on Instagram
पूजा पुढे म्हणाली की, “माझा स्वतःला रँकिंग देण्यावर विश्वास नाही. मी ते कधीच केलं नाही. जेव्हा मी बिग बॉसच्या ओटीटीच्या घरात प्रवेश केला तेव्हापासून मी पहिल्या क्रमांकावर आहे असं कधीच वागले नाही. प्रेक्षकांनी मला पहिल्या क्रमांकावर ठेवले. घरातील सहकाऱ्यांनी मला दिलेल्या कोणत्याही रँकिंगवर मी समाधानी आहे.”
“पहिली रँकिंग हवी आहे म्हणून मी हे बोलत नाही. मला स्पॉटलाइट, कॅमेरा किंवा लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं नाही. मी या इंडस्ट्रीत जन्माला आले आहे आणि शेवटपर्यंत त्याचा एक भाग राहीन. तुमच्यापैकी कोणीही माझे प्रतिस्पर्धी नाही, त्यामुळे बिग बॉसनंतर माझे आयुष्य संपणार नाही. केवळ लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या चाहत्यांना निराश करणार्या गोष्टी करणार नाही,” असं पूजा म्हणाली.