तलुगु सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्रभास. त्याने मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीची सुरवात २००२ मधील ‘ईश्वर’ या नाटकातून केली. प्रभासने आतापर्यंत बाहुबली – बिगिनिंग आणि कन्क्लुजन , साहो, डार्लिंग आणि आत्ताचा राधे श्याम यांसारख्या अनेक चित्रपटांत आपला अनोखा ठसा उमटवला आहे. तसेच त्याचे सालार, प्रोजेक्ट के आणि सर्वाधिक गाजत असलेला आदिपुरुष हे चित्रपट येत्या काळात लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
त्यापूर्वी सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त प्रभासच्या लग्नाचीच. मागील काही काळात त्याचे नाव बॉलिवूड क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री क्रिती सनाॅन सोबत जोडलं जात होतं. तसेच एवढंच तर त्यांच्या लग्नाची ही चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती, पण क्रितीने सोशल मिडियावर पोस्ट लिहित या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
नंदामुरी बालकृष्ण होस्ट करत असलेला ‘अनस्टॉपेबल’ या तेलुगु टॉक शोमध्ये प्रभासने हजेरी लावली होती. त्याचबरोबर या शोमध्ये शारवानंदने यांनी देखील हजेरी लावली होती. तर या शो दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नंदामुरी बालकृष्ण म्हणाले की, “नुकतंच या शोमध्ये शारवानंदने हजेरी लावली होती. त्याला मी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला असता, प्रभासने लग्न केल्यानंतर करणार असल्याचं उत्तर त्याने दिलं. त्यामुळे आता तुला (प्रभासला) सांगावं लागेल की तू लग्न कधी करतोयस”
या प्रश्नाचं अगदी गमतीदार आणि स्मार्ट उत्तर प्रभाने दिले तो म्हणाला की, “जर शारवानंदने असं सांगितलं असेल की माझ्यानंतर तो लग्न करेल, तर मला असं म्हणायला हवं की मी सलमान खानच्या लग्नानंतर लग्न करेन.”
त्यामुळे त्याच्या या व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे.