प्रेक्षकांची लाडकी श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना.रश्मीकाने आत्तापर्यंत तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. रश्मिकाचे लाखो चाहते आहेत, पण पुष्पा या चित्रपटामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणखीनच भर पडली आहे.
रश्मिका आता पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे. रश्मिका ही ‘झी चित्र गौरव पुरस्कार’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘पुष्पा’ या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या मुख्य भूमिकेला हिंदीमध्ये डब केले आहे. त्यामुळे रश्मिका आणि श्रेयस हे एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. तर आता ‘झी चित्र गौरव पुरस्कार’च्या निमित्ताने ते दोघेही एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात रश्मिका मंदाना लावणी करणार असल्याच समोर आलं आहे. त्यातच श्रेयस हा कार्यक्रमचे सूत्रसंचालन करतना दिसून येणार आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये श्रेयस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे, तर रश्मिका सादरीकरण करण्यासाठी स्टेजवर आलेली पाहायला मिळत आहे. रश्मिकाला पाहून श्रेयस फिदा झालेला दिसला. तो त्याच्या एक्सप्रेशन्सने रश्मिकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तर यावेळी श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉगही म्हणून दाखवला. त्यानंतर रश्मिकाने श्रेयसला फ्लाइंग किस दिली.
त्याचा व्हिडीओ पाहून चाहते देखील उत्सुक झाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्यातली ही केमिस्ट्री खूप आवडल्याचे चाहते सांगत आहेत. तर त्याचबरोबर अनेकांनी “आम्हाला तुम्हा दोघांनाही एकत्र स्क्रीनवर पाहायला आवडेल,” असंही सांगितलं. रश्मिकाचा हा मराठमोळा अंदाच सगळ्यांनाच आवडला आहे.