अनेक आयकॉनिक भूमिकांमधून आपल्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी सतीश कौशिक यांना आदरांजली वाहिली.
त्यांच्या १० वर्षांच्या मुलीने अत्यंत हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वंशिकाने शेअर केलेल्या या फोटोमुळे चाहत्यांच्या डोळेही पाणावले आहेत. वंशिकाने हा फोटो शेअर करत खाली फक्त एक रेड हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
वंशिका नेहमीच सोशल मिडियावर तिचे रील शेअर करत असते, ती तिच्या वडिलांसोबत पण व्हिडीओ शेअर करायची. तिचे व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतात. रीलद्वारे ती उत्तम अभिनय करते आणि तिला त्याची आवड देखील आहे हे दिसून येते. वंशिका तिच्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत आहे.
सतीश कौशिक यांचे पूर्ण नाव सतीश चंद्र कौशिक असे होते. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये झाला. ते उत्तम अभिनेत्यासह निर्माते आणि दिग्दर्शक आणि विनोदी कलाकारही होते. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. १९८३ मध्ये हा चित्रपट आला होता. त्यानंतर त्यांनी वो सात दिन, मासूम, मंडी, उडान, उत्सव, सागर, मोहब्बत, मि. इंडिया काश, उत्तर दक्षिण, ठिकाणा, जलवा, एक नया रिश्ता, राम लखन, वर्दी, जोशिले, प्रेम प्रतिग्या, आग से खेलेंगे अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शर्माजी नमकीन, थार आणि या वर्षी प्रदर्शित झालेल्या छत्रीवाली आणि इमर्जन्सी चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका केली.