सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाची. ‘पठाण’ च्या यशानंतर आता शाहरुखचा ‘जवान’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा निर्मिती या चित्रपटात शाहरुख खान सोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा झळकणार आहेत. चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येसुद्धा असणार आहे.
चित्रपटाचा टीझर १० जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून गाणी #Chaleya #NotRamayavastavaya #Zindabanda ही तीन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांनी या चित्रपटावर लाईक्स आणि कॉमेंटचा वर्षाव केला.
आता किंग खानच्या ‘जवान’ ची खासियत म्हणजे हा चित्रपट जगातील सर्वात मोठ्या आयमॅक्स स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे, जो जर्मनीतील लिओनबर्ग येथील फिल्मपार्क स्टुडिओमध्ये आहे. स्क्रीन १२५ मीटर रुंद आणि ७२ मीटर उंच आहे. एवढ्या मोठ्या पडद्यावर भारतीय चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
मोठ्या IMAX स्क्रीनमुळे प्रेक्षकांना चित्रपटाची कृती आणि दृश्ये खरोखर इमर्सिव्ह पद्धतीने अनुभवता येतील आणि ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.
जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जर तुम्ही अॅक्शन चित्रपट किंवा शाहरुख खानचे चाहते असाल, तर तुम्हाला हा चित्रपट नक्कीच चुकवायचा नाही.