चित्रपट आणि मालिका यांचे रिमेक अनेकदा पाहायला मिळतात. पण एखाद्या सुपरहिट चित्रपट जसाच्या तसा कॉपी होतोय हे क्वचितचं पाहायला मिळत. पण असाच काहीसा प्रकार सध्या एका आगामी चित्रपटाबद्दल झाला आहे.
लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ चित्रपट येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला अन् वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. काही लोकांना हा ट्रेलर खूप आवडला, पण दुसरीकडे मात्र हा चित्रपट साऊथमधील एका सुपरहिट चित्रपटाची संपूर्ण कॉपी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. शेहजादा हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठप्रेमुलू’ या चित्रपटाची कॉपी आहे अस अनेकांचं म्हणणं आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे शेहजादाची कथा अगदी अला वैकुंठप्रेमुलू या चित्रपटासारखी आहे.
शेहजादामध्ये क्रिती सेनन हिरोईन आहे तर अल्लू अर्जुनच्या चित्रपटात पूजा हेगडे. अभिनेता परेश रावल शेहजादामध्ये कार्तिक आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसत आहे, तर अला वैकुंठप्रेमुलूमध्ये ही भूमिका अभिनेता मुरली शर्माने साकारली होती. अला वैकुंठप्रेमुलूमध्ये आईची भूमिका तब्बूने केली होती, तर शेहजादामध्ये मनिषा कोईरालाने केली आहे. त्यामुळे आता दिग्दर्शक आणि निर्माते यांचे यावर काय म्हणणे आहे यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत.