बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आज तिसरा स्मृतिदिन. सुशांतला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला. तरी देखील त्याने त्याच्या अभिनयाने, स्वभावाने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी करोना काळात सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत त्याचे जीवन संपवले. त्याच्या अचानक निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. त्याच्या चाहत्यांना देखील प्रचंड दुःख झाले. तो आज या जगात नसला तरी त्याच्या चाहत्यांचा मनात आहे.
आज त्याच्या आठवणीत पुन्हा एकदा साऱ्यांचेच डोळे पाणावले. त्याच्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतची बहीण ‘श्वेता सिंह कीर्ती’ने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आपल्या मुलांसोबत खेळतानाचा फोटो तिने शेअर केला.
View this post on Instagram
ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “लव्ह यू भाई, तुझ्या बुद्धिमत्तेला सलाम. मला क्षणोक्षणी तुझी आठवण येते. पण मला माहित आहे की, तू माझ्या श्वासाइतका अविभाज्य भाग आहेस. त्याने मला शिफारस केलेली काही पुस्तके मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. त्याचं अस्तित्व जपत त्याला आपल्यात जगू दे.” तिच्या या भाऊक पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे सांत्वन केले.
सुशांतने त्याच्या कारकीर्दीत ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ यांसारखे सुपरहीट सिनेमे दिले. आणि आज त्याच्या आठवणीत त्याचे चाहते आजही त्याचे हे सिनेमे वारंवार पाहत आहेत.