अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा आज ४७ वा वाढदिवस आहे. तिने आता पर्यंत ‘मिस इंडिया’ आणि ‘मिस युनिव्हर्स’ असे किताब स्वतः च्या नावावर केले आहेत. १९९६ मध्ये ‘दस्तक’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या सुष्मिताने बिवी no.१, क्यू कि मे झूट नही बोलता, नो प्रोब्लेम यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सुष्मिताने फार कमी वयात दोन मुलींना दत्तक घेतले, रेने आणि अलिसा असे तिच्या मुलींची नावे आहेत.
View this post on Instagram
सुष्मिताच्या वाढदिवसानिम्मित तिच्या लेकीने म्हणजेच रेने सेनने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती अस म्हणाली “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाईफलाइन…. आता तू तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंदायी टप्प्यामध्ये प्रवेश करत असताना मला फक्त तुला धन्यवाद म्हणायचे आहे. तू खूप मोठ्या मनाची आहेस, त्यामुळे तू लोकांना सहज माफ करू शकतेस. तुझी मुलगी होणं हा देवाने मला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तुझ काम अतुलनीय आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी त्याची साक्षीदार आहे.”
“तुझ्या कामामध्ये प्रेम, समर्पण आणि मेहनत या गोष्टी दिसतात आणि परिसस्पर्शाने तू ज्याला हात लावतेस, ती गोष्ट सोन बनते. हे फक्त तुझ्या प्रेमामुळे आणि मेहनतीमुळे शक्य आहे. तू इतकं प्रामाणिकपणे काम करतेस की, ते पाहून मी तुझ्या अभिनयामध्ये तुझ्या अस्तित्वाचं प्रतिबिंब पाहते असं वाटतं. माझा सांभाळ करताना मला तुझ्यामधील कृतज्ञता, धैर्य आणि दयाळूपणाचा अनुभव आला. या भावनेने तू मला वाढवलंस. मला स्वत:ची ओळख मिळवून देण्यासाठी मदत केलीस. तू सोडून मला दुसऱ्या कोणाबरोबरही राहायचं नाहीये. तू म्हणजे घर असं आहे. तू जिकडे आहेस, तिकडे घर आहे”
पुढे ती अस हि म्हणाली “शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या आयुष्यामध्ये तू घेतलेले निर्णय योग्य का होते हे मला मी जसजशी वयाने मोठी होत आहे, तसे कळत आहेत. शिस्त आणि सातत्याने स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक-एक पाऊल टाकणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून देण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आणि अलिसाला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणं शिकवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. शिखरावर असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवावेत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.”