आपल प्रेम आपण कोणत्या पद्धतीने व्यक्त करतो हे तितकसं महत्वाचं नसतं तर ते प्रेम त्या व्यक्ती पर्यंत पोहोचतंय हे महत्वाचं!
ते असू शकतं एखाद्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गाणं गाऊन आपल्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचवणं किंवा त्या व्यक्तीला त्याच्या आवडीची वस्तू देणं, त्याच्या आवडीची फूल देणं की त्या व्यक्तीला आपल्या हातचा एखादा आवडता पदार्थ खाऊ घालणं.
असचं काहीसं केलंय तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने. त्याने चक्क त्याच्या प्रिय व्यक्ती पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर साठी अशी गोष्ट केली की सर्वत्र त्याचे कौतुक चालू आहे.
View this post on Instagram
सर्वत्र सध्या अक्षया या आणि हार्दिकच्या लग्नाची धामधूम दिसून येत आहे. लवकरच ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. मालिका विश्वातली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येत आहे. मे महिन्यात या दोघांचा साखरपुडा मित्रमंडळी आणि घरच्यांच्या उपस्थितीत पार पडला. साखरपुडा झाल्यानंतर दोघांनी एकत्र कोकण आणि थेट लंडनलाही सफर केली. दोघेही आता शूटिंग मधून वेळ काढून आपल्या लग्नाची तयारी करत आहेत. नुकतेच त्यांचे केळवण झाले. अक्षयाने तिच्या बॅचलर पार्टीचे आणि केळवणाचे फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
यावेळी हार्दिकने अनोख्या पद्धतीने त्याचं प्रेम व्यक्त केले आहे त्याने अक्षयासाठी चक्क स्वतः साडी विणायला घेतली आहे. लग्नाची तयारी म्हणजेच खरेदीची धामधूम, नातेवाईकांची लगबग असूनही हार्दिक अक्षयासाठी खास पैठणी विणताना दिसून येत आहे. असे हे प्रेमाचे धागे हार्दिक सोबत त्या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी सुद्धा विणले. यावेळी वीणा जगताप, रुचा आपटे, अमोल नाईकने सुद्धा धागे विणून हातमागावर पैठणी विणण्याचा आनंद घेतला. हे सर्व खास क्षण मित्र मंडळींनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तर आता फक्त अक्षया आणि हार्दिकची लग्नगाठ कधी बांधली जाईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.