सिनेसृष्टीतील कलाकारांच्या लग्नाची लगीनसराई अजूनही सुरूच आहे. यामध्ये आता भर पडली ती म्हणजे अभिनेत्री ‘रश्मी पाटील’ची. झी मराठी वरील कारभारी लयभारी या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
कारभारी लयभारी या मालिकेमध्ये तिने शोना ही नकारात्मक भूमिका केली. असे असले तरी तिच्या कामावर तिचे चाहते प्रचंड खूश होते. रश्मी सुरुवातीपासून मॉडेलिंग आणि डान्स करत आहे. तिला नृत्याची प्रचंड आवड. अभिनयासोबत तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रातही प्राविण्य मिळवले आहे. अभिनय, नृत्य या व्यतिरिक्तही तिने कला क्षेत्रात इंटिरियर डेकोरेटर म्हणून शिक्षण घेतले आहे.
रश्मी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव असते. तसेच ती तिच्या अनेक खासगी बाबी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने लग्न ठरल्याची बातमी दिली होती. परंतू तिच्या जोडीदाराचं नाव अनेक दिवस गुलदस्त्यातच होते. त्यामुळे सर्वचजण त्याचे नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.
View this post on Instagram
२१ एप्रिल रोजी रशमीचा साखरपुडा पार पडला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय असे आहे. रश्मीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज् शेअर केले आहेत. त्यामध्ये ते दोघेही एकदम रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
रश्मीच्या या पोस्टवर संपूर्ण सिनेसृष्टितून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.