बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या गोष्टीची चर्चा असेल ते काही सांगता येत नाही. तर सध्या सर्वत्र धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील वार्षिक समारंभाची. काल, १५ डिसेंबर रोजी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा सालाबादप्रमाणे वार्षिक सोहळा पार पडला.
या शाळेमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांची मुले शिकत आहेत. काल या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अनेकांच्या मुलांनी त्यांच्या आगळ्या-वेगळ्या कलाकृतीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. आजवर आपण अनेकदा कलाकारांच्या मुलांना त्यांच्यासोबत पाहिले आहे. परंतू सहसा कधी कोणाला सादरीकरण करताना पाहिले नव्हते. आज त्यांचे सादरीकरण पाहून सर्वचजण अवाक् झाले आहेत. तसेच या कार्यक्रमादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
वार्षिक समारंभासाठी यावेळी शाहरुख खान, करीना कपूर, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, करण जोहर यांसारख्या अन्य काही कलाकार आपल्या मुलांना पाठींबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे सध्या स्टारकिड्सची भारीच चर्चा रंगली आहे. शाहरुख खान आणि गौरी यांचा मुलगा ‘अबराम’ने एक नाटक सादर केले. यादरम्यान त्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या गाण्यावर डान्स केला. एवढेच नाही तर आणखी एक खास गोष्ट म्हणजे अबरामने खूपच सुंदर पद्धतीने शाहरुखची सिग्नेचर पोजही दिली.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी ‘आराध्या’ हिनेही उत्तम अभिनय करत डान्सही केला. तिचा अभिनय पाहून सारेच थक्क झाले. शेवटी रक्तातील खानदानी गुण तिच्यातही आहेत, जे यावेळी सर्वांसमोर आले. त्यामुळे सध्या सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तसेच या कार्यक्रमात आराध्या निराळ्या वेशभूषेत आणि केशभूषेत पाहायला मिळाल्यामुळे ती अगदी तिच्या आईसारखी म्हणजेच ऐश्वर्यासारखी दिसत होती. तसेच यावेळी ऐश्वर्या आराध्याचा व्हिडीओ देखील शूट करताना दिसली.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा म्हणजेच ‘तैमूर’ने सफेद रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच त्याने बर्फी सिनेमाच्या गाण्यावर सादरीकरण केले. याशिवाय शाहिद कपूर आणि मीरा यांची मुलं, करण जोहरची दोन्ही मुलं या कार्यक्रमात सादरीकरण करताना दिसले. यावेळी सर्वच स्टारकिड्स निरनिराळ्या वेशभूषेत दिसले. या स्टारकिड्स मधील कला या निमित्ताने सर्वांसमोर आली. त्यामुळे आता असं म्हणायला हरकत नाही की, सध्या सेलेब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांचीच जोरदार चर्चा सुरु आहे.
व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ पाहून सिनेसृष्टीतील इतर कलाकार मंडळी आणि चाहते स्टारकिड्सवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.