‘हम साथ साथ है’ या बॉलिवूड चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री Tabassum Fatima हाशमी ऊर्फ तब्बू. तब्बूने आतापर्यंत हिंदी चित्रपटाबरोबरच तमिळ, तेलगु, मल्याळम, इंग्रजी, मराठी आणि बंगाली भाषेतील चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने तब्बूला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहेत. आपल्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणानंतर तब्बू प्रत्येक दशकात यशस्वी चित्रपट देण्यात कदाचित एकमेव अभिनेत्री ठरली आहे.
आतापर्यंत तब्बू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तर अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेेलं आहे. पण आजही तब्बू एकटं आयुष्य जगते. एक काळ असा होता जेव्हा तब्बूचं नाव प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुनसोबत जोडण्यात आलं. दोघांच्या भेटीच्या आणि प्रेमाच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगल्या होत्या.
याविषयी तब्बूने अनेक वर्षांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये मोठा खुलासा केला. २००७ साली जेव्हा करणने तब्बूला नागार्जुनसोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं तेव्हा तिने उघडपणे सर्व गोष्टी सांगितल्या. बॉलिवूड स्टार्स बर्याचदा आपल्या सहकलाकरांच्या प्रेमात पडतात. मग त्यांच्या प्रेमाची बरीच चर्चाही होते. परंतू बऱ्याचदा प्रेमात पडल्यानंतर काही काळाने या कलाकारांना ब्रेकअपची बातमी देखील पसरते. अशा प्रेमकहाणीच्या यादीमध्ये अभिनेत्री तब्बू हिचा देखील समावेश आहे.
कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या तब्बूच्या हृदयावर मात्र दक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन याने जवळपास १० वर्षे प्रेम केले. परंतू १० वर्षांनंतर ते दोघे वेगळे झाले. याबद्दल भाष्य करताना तब्बू म्हणाली की, “आयुष्यात बॉयफ्रेंड येतात जातात, पण माझ्या आयुष्यात अक्किनेनी नागार्जुन कायम राहील.” तसेच ती पुढे म्हणाली की, “अक्किनेनी नागार्जुन माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याला लावायला माझ्याकडे कोणतंही लेबल नाही. आमच्यातील मैत्री कोणतंही दुसरं नातं तोडू शकत नाही.”
अक्किनेनी नागार्जुन जरी त्याच्या आयुष्यात पुढे गेला असेल तरी तब्बू मात्र अजूनही तिथेच आहे आणि इतक्या वर्षांनंतर देखील त्यांची प्रेमकहाणी कायमच चर्चेत असते.