बॉलिवूड मधील अनेक कलाकार हॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन, आलिया भट्ट यांच्या सारखेचं बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची बातमी सोशल मिडीयावर पसरली आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता इशान खट्टर हा आहे. त्याला बॉलिवूडमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणून ओळखले जाते. तो सोशल मीडियावर सतत सक्रीय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.
इशानने ‘धडक’, ‘अ सुटेबल बॉय’, ‘फोन भूत’, ‘खाली पिली’ या चित्रपटांच्या माद्यमातून इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांमध्ये तो मुख्य भूमिकेत होता. त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. बॉलिवूडमध्ये काम करता करता त्याला एका हॉलिवूड वेब सिरीजची ऑफर आली आहे.
इशानला काही महिन्यांपूर्वी ‘द परफेक्ट कपल’ या हॉलिवूड वेब सिरीजची ऑफर आली होती. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज स्ट्रीम करण्यात येणार आहे. या वेब सिरीजमध्ये तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिरीजमध्ये तो हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री निकोल किडमनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ही बातमी त्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माद्यमातून दिली आहे. व त्या पोस्टला त्याने “नवीन सुरुवात” असं कॅप्शन देखील दिले आहे.
View this post on Instagram
त्याची ही पोस्ट पाहून त्याचा चाहता वर्ग प्रचंड खुश झाला आहे. व त्याच्या पोस्ट ला कॉमेंट करत नेटकरी व त्याचा मित्र परिवार त्याचं अभिनंदन करत आहेत.