प्रियंका चोप्रा ही बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण मागील काही वर्षांपासून प्रियंका बॉलीवूड सिनेमांमधील तिचे प्रमाण कमी झालं आहे. प्रियंका आता हॉलीवूडमध्ये काम करते. तसेच प्रियंकाने अमेरिकन गायक निक जोनस सोबत लग्नगाठ बांधून तिकडेच स्थायिक झाली आहे.
प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. तसेच ती सध्या पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी सह भारतात आहे. नीता अंबानीच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ च्या उद्घाटनाला प्रियंकाने पती निक सोबत हजेरी लावली होती. यावेळी प्रियंका आणि निकने एका अनोख्या पद्धतीने फोटोशूट केले आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा: Priyanka Chopra and Nick Jonas stun at Mumbai event, share date night photos
प्रियंका आणि निकने रिक्षा बरोबर एक हटके फोटोशूट केले. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाकांने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करत हटके लूक केला आहे. तर निकने ब्लेझरमध्ये खास लूक केला आहे. रिक्षाच्या बाहेर उभं राहून प्रियंका आणि निकने फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. परंतु, प्रियंका-निकपेक्षा फोटोमधील रिक्षाचालकाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या नाईटचे फोटो शेअर करताना, प्रियंकाने लिहिले, “माझ्या हक्काच्या माणसासोबत निक सोबत डेट नाईट..” या फोटोत प्रियंका चोप्रा मुंबईच्या रिक्षात दिसत असून तिने निक सोबत खास पोझ दिलीय. रिक्षावाला सुद्धा या दोघांकडे आश्चर्याने पाहतोय. प्रियंकाने जो ड्रेस परिधान केलाय त्याबद्दल तिने खास गोष्ट सांगितली, प्रियंका लिहिते.. “हा सुंदर पोशाख 65 वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीचा वापर करून बनवला गेलाय. यात चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग वापरले आहे.” अशाप्रकारे ६५ वर्षांपूर्वीची साडी रिसायकल करून प्रियंकाने हा खास ड्रेस परिधान केलाय.
तिच्या या पोस्टवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे, “ रिक्षावाले काका : तुमचं झालं असेल तर मी निघू?”. तर दुसऱ्याने लिहिले, “रिक्षावाले काका : आधी पैसे द्या” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “उबर वर रिक्षासाठी १७० रुपये मोजावे लागत होते. आम्ही रस्त्यावरील रिक्षा पकडून १२० रुपयांत आलो”, असं म्हटलं आहे. “कोण आहेत हे लोक? कुठून येतात हे लोक?” असंही एकाने म्हटलं आहे. त्यामुळे तीच हे फोटोशूट एक चर्चेचा विषय बनला आहे.
हे देखील वाचा: ‘करण जोहरमुळे प्रियंका चोप्रा बॉलीवूड सोडून गेली’ कंगनाचं ट्वीट चर्चेत