आपणासर्वांस माहित आहे की, आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ (Shreyas Talpade) सध्या रुग्णालयात उपचात घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. ‘वेलकम टू जंगल’ या सिनेमाचे शूटिंग संपवून श्रेयस घरी आल्यावर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने त्याच्या पत्नीला सांगितले. त्याची पत्नी दीप्ती श्रेयसला तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पोहचताच त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली.
आत्ता मात्र चाहत्यांना श्रेयसची तब्बेत कशी आहे? आणि त्याला कधी डिस्चार्ज मिळणार? याबाबत अनेक प्रश्न पडले आहे. तुंबाड फेम अभिनेता व निर्माता ‘सोहम शाह’ याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयसच्या प्रकृतीबद्दल नवीन अपडेट शेअर केले. जेव्हा सोहम श्रेयसला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, “ज्या रात्री त्याला रुग्णालयात नेण्यात आले, त्याच रात्री मी त्याला भेटायला गेलो होतो आणि आजही मी तिथे होतो. श्रेयसला त्याच्या त्याच जुन्या स्टाईलमध्ये हसताना आणि बोलताना पाहून खूप दिलासा मिळाला. मी त्याला भेटायला गेल्याने त्याने माझे आभार मानले.”
श्रेयसला डिस्चार्ज कधी मिळणार याबाबत सांगताना सोहमने सांगितले की, “शहाणपण आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्या श्रेयसच्या पत्नी दीप्ती यांचे आभार. कारण ट्रॅफिकशी झुंज देत हॉस्पिटल गाठणे हे मोठे आव्हान होते. पण दीप्तीने ही जबाबदारी चांगली निभावली. देवाचे आभार मानतो की, तो बरा होत आहे आणि सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. श्रेयसला रविवारी रात्री १७ डिसेंबर किंवा सोमवारी सकाळी १८ डिसेंबरला डिस्चार्ज दिला जाईल.”
तसेच त्याच्या कुटुंबीयांनी देखील एक मुलाखतीमध्ये सांगितले की, श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. “श्रेयस तळपदे आता बरा आहे. तो ठिक होत असून शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. आज सकाळी तो आमच्याकडे बघून हसला. त्यामुळे आम्हा सर्वांना दिलासा मिळाला आहे. तो स्वत: काही दिवसांत माध्यमांशी बोलेल,” अशी माहिती श्रेयसच्या कुटुंबातील सदस्याने दिली.
श्रेयस हा गेल्या दोन दशकांहून अधिक मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांचे मन जिंकले. येवढेच नाही तर तो त्याच्या प्रभावी भूमिकांमुळे नेहमीच चाहत्यांच्या कौतुकाचा विषय देखील ठरला आहे. श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे हितचिंतक प्रार्थना करत आहेत. सोशल मिडियावरही श्रेयसच्या तब्येतीविषयी चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच बॉबी देओलने देखील दोन दिवसांपूर्वीच श्रेयसच्या तब्येतीची माहिती दिली होती.
Read Also : Ram Mandir Grand Opening: Amitabh Bachchan and Rajinikanth Set to Shine Alongside other Bollywood Stars!