बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नसीमुळे चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर या दोघांमध्ये लवकरच तिसरा येणार असून आलिया सध्या तिच्या आयुष्यातील या गोड क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. बाळाच्या स्वागताबरोबर आता आलिया आणखी एका गोष्टीची तयारी करण्यात गुंतली आहे.
रणबीर कपूरने आलिया भट्ट सोबत लग्न केल्यानंतर आपल्या पासपोर्टवर मॅरिटल स्टेटस विवाहीत म्हणून बदलले होते. परंतु आलिया मात्र अजूनही कपूर ऐवजी भट्ट हेच आडनाव लावत आली आहे.
View this post on Instagram
बाळाची चाहुल लागल्यानंतर आलिया आता नाव बदलण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. पण आलिया भट्ट नाव बदलणार म्हणजे नक्की काय करणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आता आलिया तीच नाव बदलून आलिया कपूर करणार का? आणि आलियाच्या या निर्णयाला लोकं स्वीकारतील का या चर्चा सुरु आहेत पण आलियाने मात्र वेगळ्याच पद्धतीने नाव बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी आता कपूर कुटुंबाचा भाग आहे, त्यामुळे लवकरच मी अधिकृतरित्या कपूर होईन आणि मला हे करताना खूपच आनंद होत आहे.”
यापुढे आलिया असेही म्हणाली आहे की, “आता लवकरच आमचं बाळ येईल, त्यामुळे आता मला भट्ट रहायचं नाही. कपूर कुटुंब हे खूप मोठं आणि एकत्र कुटुंब आहे, तुम्हाला कळलं असेल की मला नेमकं काय म्हणायचे आहे. कपूर कुटुंबामध्ये मला लेफ्ट आऊट असल्यासारखं फील नाही करायचं. मी नेहमीच आलिया भट्ट राहीन पण आता फक्त भट्ट या नावापुढे कपूर हे नाव असेल.”