अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
आपल्या आवडत्या सेलिब्रेटींविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अगदी ते कुठे फिरायला गेले इथपासून ते कुणाला डेट करत आहेत इथपर्यंत. सेलिब्रेटी बऱ्याचदा डेट करताना आपले नाते सुरवातीला लपवताना दिसतात.
View this post on Instagram
अशीच एक सेलिब्रिटी जोडी आहे, ज्यांच्याविषयी चाहत्यांना कायम जाणून घ्यायची उत्सुकता असते. ती जोडी म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी यांची कन्या, अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल. अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचेही नाते फार काळापासून चर्चेत आहे. तर खबर अशी की दोघेही नुकताच एकत्र म्हणजेच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत. बांद्रा येथे दोघांनी घर घेतलं आहे.
केएल राहुल सध्या झिम्बाम्वे दौऱ्यावर असून अथियाने त्या घराचा ताबा घेतला आहे. केएल राहुल घरी येण्याआधी ते घर सजवण्याची जबाबदारी अथियाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. दरम्यान अथिया शेट्टीने जुलैमध्येच गृहप्रवेशाची छोटीशी पूजा करून गृहप्रवेशाचा कार्यक्रम उरकला आहे.