बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक गुडन्यूज दिली की सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी २० ऑगस्ट रोजी एका गोड बाळाला जन्म दिला आहे. या बातमीने चाहतेच नाही तर संपुर्ण बॉलिवूड कलाकारांकडून सोनम आणि तिच्या बाळावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. तसेच अनिल कपूर हे आजोबा झाल्याने त्यांच्याकडेही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले.
आजोबा झाल्यानंतर त्यांना कसे वाटत आहे आणि आजोबा झाल्या नंतरचा त्यांचा अनुभव याबद्दल अनेक प्रश्न त्यांचा चाहता वर्ग विचारत होता.
View this post on Instagram
नुकतच अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत या अनुभवाबद्दलच्या खास गोष्टी साध्या अन् सुंदर भाषेत मांडल्या आहेत. आजोबा होणे हा सर्वाधिक आनंदाच्या क्षणांतील एक खास क्षण आहे. आजोबा अनिल कपूर यांना नुकताच नातू झाला आहे, त्यामुळे ते भरपूर खुश आहेत. एका मुलाखतीत आजोबा झाल्यानंतर काय वाटतं हे आता अनिल कपूर यांनी सांगितले आहे. ते म्हणाले आहे की, ‘आजोबा झाल्यानंतरचा अनुभव खुपच वेगळा आहे. आपण जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटतंय. सध्या मी एका प्रोजेक्ट निमित्त व्यस्त असल्याने मुंचकीनसोबत म्हणजे आमच्या छोट्या नातवासोबत वेळ घालवनं शक्य होत नाही. पण त्यांची आजी म्हणजे माझी पत्नी सुनीता आणि मुलगी सोनम, जावई आनंद हे सर्व बाळाची काळजी घेत आहेत. मी प्रत्यक्ष त्याच्या सोबत नसलो तरी मी त्याच्या सोबतच आहे. त्याला दररोज पाहणे हे माझ्यासाठी सर्वात आनंददयी आहे.’
तसेच आईपण अनुभवणाऱ्या सोनम कपूरने बाळ आल्यानंतरचे जीवन कसे बदलते याबद्दल एका मुलाखतीत सांगत असताना सोनम म्हणाली की,“मुल आलं की आपले प्राधान्यक्रम बदलतात. पण मला वाटतं की ते मुल जगात येणे हा आपला निर्णय आहे. आपण त्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा एक अतिशय स्वार्थी निर्णय आहे.’