कलर्स मराठी वाहिनीवरील सध्याचा सर्वात चर्चेतील शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ सीझन ४. बिग बॉस मराठी हा एक रिॲलिटी शो आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात ही येत्या २ ऑक्टोबर पासून होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचे काही टीझर प्रदर्शित झाले. त्यानुसार या पर्वाची थिम “All is well” असं खुद्द महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे.
यावेळी घरात कोणते कलाकार स्पर्धक म्हणून येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’ सीझन ४ च्या ग्रँड प्रीमियरचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोन स्पर्धक बोल्ड लुक मध्ये दिसत आहेत. तर हे स्पर्धक नक्की कोण आहेत या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक नेटकऱ्यांनी आपापले अंदाज वर्तवले आहेत.
‘मोहे अंग लगादे’ या गाण्यावर डान्स करत अभिनेता आणि अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
View this post on Instagram
पण बिग बॉसच्या घरात जाणारी ही जोडी नेमकी कोण आहे हे अजूनही समोर आले नाही. या दोघांचाही चेहरा ठीकसा दिसत नसला तरी प्रेक्षकांनी त्यांची मते मांडायला सुरुवात केली आहे.
काही प्रेक्षकांच्या मते या व्हिडिओ मधील अभिनेत्री ही नेहा खान आहे, म्हणजेच लोकप्रिय ‘देवमाणूस’ या मालिकेतील पोलीस ऑफिसर दिव्या सिंग. तर काही प्रेक्षकांच्या मते ही रुचिरा जाधव म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको मधील माया. यांसारख्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण आता थेट २ ऑक्टोबरला संध्या. ७ वाजता आपल्या सर्वांसमोर येईलच.