सध्या पोन्नियिन सेल्वन (PS-1) सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच ३० सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याचे जोरदार प्रमोशन बघायला मिळत आहे. कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये प्रमोशनसाठी या सिनेमाची टीम आली होती. प्रमोशनदरम्यान सिनेमाच्या टीमने खूप धमाल केली. मात्र या शोमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने उपस्थिती लावली नाही. यामुळे अनेक चर्चा झाडल्या गेल्या.
पोन्नियिन सेल्वन सिनेमाची टीम आगामी एपिसोडमध्ये द कपिल शर्माच्या शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. यामध्ये विक्रम आणि त्रिशा यांचाही समावेश आहे. मात्र ऐश्वर्या राय या कार्यक्रमामध्ये दिसून आली नाही. यामुळे तिचे चाहते देखील थोडे नाराज झाले.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय यात दिसून न आल्याने जोरदार चर्चा सुरु झाल्या. यामागे सुद्धा सलमान खानचे खास कनेक्शन असल्याचे चाहत्यांच्या चर्चांमधून दिसून येत आहे. कपिल शर्माच्या या शोचा सलमान खान हा निर्माता आहे. त्यामुळे या शोमध्ये ऐश्वर्याने जाणे टाळल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.
मात्र काही जण ऐश्वर्याचा बचाव करताना सुद्धा दिसून आले. ए दिल है मुश्किल सिनेमाच्या वेळी ऐश्वर्याने या शोच्या माध्यमातून प्रमोशन केल्याचे चाहत्यांनी बचाव करताना सांगितले. तर काही जण ऐश्वर्या इतरत्र प्रमोशनसाठी व्यस्त असेल असे सांगत आहेत.