संपूर्ण सिनेसृष्टीला अभिनयाने आणि नृत्याने भूरळ पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताचे मालिका, चित्रपट, वेब सिरीज आणि वेगवेगळ्या शोच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केले आहे. अनेकदा आपले कलाकार मंडळी मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्तही इतर क्षेत्रामध्ये आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करत असतात.
तसचं काहीसं आपल्या प्राजक्ता सोबतही झाले आहे. तिने मागेच तिच्यात दडलेल्या कवयित्रीला ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून चाहत्यांसमोर आणले होते. पण आता मात्र तिने खूप मोठी उडी मारली आहे, तिने तिचा नवीन ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. तर तिने तिच्या ब्रँडचं नाव ‘प्राजक्तराज’ ठेवलं असून ६ जानेवारी २०२३ रोजी या ज्वेलरी ब्रँडचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
प्राजक्तराज हा ब्रँड अस्सल मराठमोळ्या दागिन्यांनी, पारंपरिक आणि घरंदाज अलंकारांनी सामावलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या प्राजक्ताच्या या ज्वेलरी ब्रँडच्या नावाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता होती. तर या कार्यक्रमाच्या वेळी प्राजक्ताने प्राजक्तराज हे नाव का ठेवले आणि तिच्या या नवीन ब्रँड बद्दल सांगताना ती म्हणाली की, “दागिन्यांचा स्वतःचा ब्रँड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न मी केला आहे.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “प्राजक्तराज’ हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाचं आहे. ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच ‘प्राजक्तराज’ची खासियत असेल. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील, जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. लवकरच आम्ही पुरुषांसाठीही अलंकार घेऊन येऊ. याशिवाय अनेक कल्पना आहेत, ज्या हळूहळू आपल्या समोर येतीलच. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अभिनयावर, नृत्यावर, कवितासंग्रहावर प्रेम केले, तसेच प्रेम, प्रतिसाद तुम्ही ‘प्राजक्तराज’वर ही कराल, अशी अपेक्षा बाळगते.”
तसेच या कार्यक्रमाच्या वेळी राज ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि इतिहासकार विश्वास पाटील आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.