धडाकेबाज (Dhadakebaaz) हा चित्रपट १९९० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे यांसारखे अनेक तगड्या कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. पण या नायक, नायिकांव्यतिरिक्त या सिनेमातील खलनायकाने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर हा खलनायक म्हणजे अर्थात ‘कवट्या महाकाळ.’
नावाप्रमाणेच रूप, त्याचा शरीरभर संपूर्ण काळ्या रंगाचा पेहराव आणि कवटी. तीही डोक्यावर किंवा गळ्यात नाही तर तोंडावर. त्यात “कवट्या महाकाळ म्हणतात मला, कवट्या महाकाळ आ थू” या त्याच्या डायलॉगने आणि जबरदस्त सादरीकरणाने पाहणाऱ्यांची घाबरगुंडीचं उडायची.
पण तुम्हाला माहित आहे कवट्या महाकाळ का हे नाव कसे सुचले? आणि या कवटीमागे नक्की कोण होतं? तर चला पाहूया.