हिंदी बिग बॉसचा सध्या सोळावं पर्व सुरु आहे. यंदाच्या हटके आणि जबरदस्त स्पर्धकांमुळे हा सिझन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात चांगलाच यशस्वी ठरला आहे. आता मात्र बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा जवळ येत चालला आहे. पण त्यापूर्वीच चाहत्यांना ह्या आठवड्यात मोठा धक्का बसला आहे.
या आठवड्यात असे काही घडले आहे की, यापूर्वीच्या १५ सिझनमध्ये देखील नव्हते घडले. या सिझनमधील छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जाणारा ‘अब्दू रोझिक‘ने बिग बॉसच्या सगळ्याच चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे. तर त्याचा गोड आणि दिलखुलास अंदाजही प्रेक्षकांना चांगलाच भावला, पण आता मात्र त्याला पुन्हा एकदा आणि अखेरचा बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. अब्दूने घरातून एक्झिट घेतल्यानंतर घरातील सर्वच सदस्य भावूक झाले आणि त्याचा जिगरी यार शिव ठाकरेही ढसाढसा रडला.
तसेच या आठवड्यात आणखी दोन स्पर्धकांची एक्झिट झाली आहे ती म्हणजे बिग बॉस १६ चा मास्टरमाइंड ‘साजिद खान’ आणि गोड ‘श्रीजीता डे’ यांची. ‘श्रीजीता डे’ ला फिनाले पूर्वीच हा शो सोडवा लागला आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चाहते मात्र दुःखी झाले आहेत. या शोच्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे बिग बॉसने साजिद खानला खूप खास पद्धतीने निरोप दिला आहे, तसेच बिग बॉसच्या म्हणण्यानुसार तो घरातील असा एकमेव स्पर्धक आहे ज्याचा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आदर केला.
श्रीजीता ही सिझनच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडली होती, परंतु तीने वाईल्ड कार्ड म्हणून घरात पुन्हा एकदा एंट्री घेतली, अन् १०० दिवसांचा टप्पा पार केला. पण आज मात्र तिला देखील बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
त्यामुळे या आठवड्यात एकूण ३ सदस्यांच्या एक्झिटमुळे प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. तर बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा फिनाले हा १२ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून यंदाच्या या धमाकेदार सिझन मधून कोण ट्रॉफीचा मान पटकावणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.