लग्न म्हणजे आयुष्यभर आपल्या हक्काच्या माणसाची मिळणारी साथ आणि ती साथ फक्त याच जन्मात नाही तर पुढे सात जन्मी मिळणारी असते, अस म्हणतात. त्यामुळे लग्न करताना खूप विचार करून जोडीदाराची निवड केली जाते. जोडीदार आपल्या जवळच्या व्यक्तीचा असो वा आपल्या लाडक्या कलाकार मंडळीचा… ते जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात.
आत्ताचं बिग बॉस मराठी सिझन 4 च्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. टेलिव्हिजनवरील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तुम्हाला माहीत आहे का? की राखीने आतापर्यंत किती लग्न केले आहेत?
२००६ मध्ये अभिषेक अवस्थी सोबत अवघे ३ वर्ष तिचे डेटिंग सुरू होते. त्यांनतर ३१ डिसेंबर २०१८ मध्ये राखी, दीपक कलाल याच्या सोबत लग्नबंधनात अडकली होती. पण हे नाते फार काळ टिकले नाही. तर २००९ मध्ये राखीने नॅशनल television वर तिचा स्वयंवर आयोजित करून १५ स्पर्धकांना काढून टाकल्यानंतर एलेश पारुजनवाला याची निवड करत त्याचासोबत लग्न केले. हेही लग्न फार काळ न टिकले नाही. १६ एप्रिल २०२० ला राखीने रितेश राज याच्यासोबत लग्न केले आणि अवघ्या ८ महिन्यांनंतर राखीने लग्नाच्या विधींचे फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. पण हे लग्न देखील जास्त दिवस टिकले नाही.
नुकतच २०२२ मध्ये राखीने आदिल खान दुर्रानी याच्या सोबत त्याच्याच रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर राखीने बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावा केला. लग्नानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केलेत. अगदी लग्नासाठी फातिमा हे नावही बदललं. मात्र यानंतर लगेच आदिलने राखीसोबत लग्न केल्याचा नकार दिला. साहजिकच राखीला मोठा धक्का बसला आहे. आदिलने जर हे लग्न मानलं नाही तर हा लव्ह जिहाद असेल, असं राखी म्हणाली. मीडियासमोर ती ढसाढसा रडली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना राखीला रडू कोसळलं होतं. “आदिलने मला स्वीकारलं नाही तर हे लव्ह-जिहादच आहे. जर त्याने माझा स्वीकार केला तर हा लव्ह-मॅरेज असेल, निकाह असेल. मी साफ मनाने हा निकाह केला होता. मी अल्लाहकडे विनंती करते की आदिलने हे लग्न स्वीकारावं किंवा मग अल्लाहने माझा जीव घ्यावा. आता हा कलंक मला सहन होत नाही”, असं ती म्हणाली आहे.
राखीचा हा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेजण तिला सांत्वन देत आहेत. तू समजूतदारपणे निर्णय घेत नाहीस, सगळे तुझा वापर करतात, असं एका युजरने लिहिलं आहे. मला राखीला असं रडताना पाहून वाईट वाटतंय, असं एका युजरने म्हटलं आहे. अर्थात काहींनी राखी ड्रामा करत असल्याचंही म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. राखीच्या आईला कॅन्सरनंतर आता ब्रेन ट्युमरचं निदान झालं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.