हिंदी बिग बॉसचं सध्या सोळावं पर्व सुरु आहे. यंदाच्या हटके आणि जबरदस्त स्पर्धकांमुळे हा सिझन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात चांगलाच यशस्वी ठरला आहे. आता मात्र बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले जवळ येत चालला आहे.
साजिद खान हा बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त सदस्यांपैकी एक सदस्य होता. साजिद खान बिग बॉसच्या घरात आल्या पासून त्याच्यावर घराबाहेरील अनेक अभिनेत्रींनी लैगिक अत्याचाराचे आरोप केले. त्याचं बिग बॉस मध्ये येणं हे अनेकांना आवडलं नाही, म्हणून त्याला घरातून बाहेर काढण्याची देखील मागणी करण्यात आली होती.
साजिद खान नुकताच घरातून एलिमिनेट झाला आहे. त्याने घरातून बाहेर येताच नव्या चित्रपटाची घोषणा केली. साजिद खान सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरात त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत होता. शिव ठाकरे, निम्रत, एमसी स्टॅन, अब्दू रोझिक आणि सुंबूल तौकीर खान यांच्याबरोबर त्याची चांगली गट्टी जमली होती. गेली अनेक वर्ष प्रसिद्धीपासून दूर असलेला साजिद खान ‘बिग बॉस १६’मध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मध्यंतरीच्या काळात त्याच्यावर अनेकींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यामुळे त्याला काम मिळणं ही बंद झालं होतं. पण आता तो एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे.
त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे 100%. हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार आणि यात कोण कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाच्या कारणामुळेच त्याने बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.आता त्याचा हा चित्रपट किती चालणार आणि प्रेक्षक त्याच्या चित्रपटाला डोक्यावर घेणार कि नाही हे पाहण्यासारखे असणार आहे.