आपल्या प्रत्येकाच एक स्वप्न असतं, की समुद्र किनारी आपलं स्वतःच असं एक आलिशान घर असावं. यासाठी आपण सगळे प्रचंड मेहनत देखील घेतो. आपलं घर आपण आपल्याला हवं तसं सजवतो देखील. तर घराच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेत असलेलं घर म्हणजे बॉलिवूडचा किंग म्हणजेच ‘शाहरुख खान’ (Shah Rukh Khan) याचं अलिशान घर. शाहरुख खान याचा मन्नत हा बंगला कोणाला माहित नाही असं नाही. त्याच्या घराबाहेर नेहमीच आपल्याला हजारो लोक दिसत असतात. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या घराबाहेर त्याचे हजारो-लाखो चाहते येतात. आपण एकदा तरी शाहरुख खानला भेटावं किंवा त्याला फक्त बघता यावं ही सगळ्यांचीच ईच्छा असते. शाहरुख जरी दिसला नाही तरी चाहते त्याच्या घराबाहेर फोटो काढून निघून जातात.
शाहरुखने हा बंगला २००१ साली विकत घेतला होता. त्यांनतर शाहरुखच्या बायकोने म्हणजेच गौरी खानने हा संपूर्ण बंगला सजवला. गौरी ही एक उत्तम आणि प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. तिने आत्तापर्यंत करण जोहर, अनन्या पांडे यांसारख्या अनेक मोठ-मोठ्या कलाकारांचे घर डिझाईन केले आहे. ती तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच अनेक इंटेरियर डिझायनचे फोटो शेअर करत असते. गौरीने चार वर्ष मेहनत घेऊन हा बंगला सजवला आहे.
पण तुम्हाला या बंगल्यामागची खरी कथा माहित आहे का? २००१ साली शाहरुखने ‘बाई खोरशेद भानू संजना’ या ट्रस्टकडून हा बंगला विकत घेतला होता. शाहरुखने हा बंगला जेव्हा विकत घेतला तेव्हा या बंगल्याचे नाव ‘विला वियना’ असं होतं. त्यानंतर शाहरुखने ते नाव बदलून बंगल्याचे नाव जन्नत असे ठेवले. मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांनी बंगल्याचे नाव बदलून मन्नत असे ठेवले. २००१ साली शाहरुखने हा बंगला ११ कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला होता. आता याच बंगल्याची किंमत २०० कोटींहून अधिक आहे.
मन्नत हा बंगला कीकू गांधी यांच्या मालकीचा होता. या बंगल्यात गांधीजींचे आई – वडील रहायचे. पिढ्यानपिढ्या या बंगल्यात राहून गेल्या आहेत, तरीही आजही हा बंगला तितकाच मजबूत आहे. शाहरुखच्या घरी नेहमीच पार्ट्या होत असतात. यावेळी अनेक सेलिब्रिटी त्याच्या घरी जात असतात, त्यामुळे शाहरुखच्या घरातले अनेक फोटो व्हायरल होतात. आतमधून हा बंगला अगदी आलिशान आहे. महागडे झुंबर, काळ्या कलरच्या भिंती, विंटेज शोपीस आणि त्याला थोडा स्टायलिश टच. यामुळे हा बंगला खूपच सुंदर आहे. या बंगल्यात एक स्विमिंगपूल देखील आहे. त्यासोबतच एक टेनिस कोर्ट आणि बॉक्सिंग रिंग देखील आहे.
त्यामुळे किंग खानच्या अॅक्टिंग सारखंच त्याच्या घराचे देखील अनेक चाहते आहेत.