आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी दिग्दर्शनात आपले पाऊल टाकले आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. तो म्हणजे सैफ अली खानचा मेहुणा अभिनेता कुणाल खेमू. अभिनेता Kunal Khemu याने आतापर्यंत आपल्या उत्तम अभिनयाने सगळ्यांना भारावून सोडले आहे, त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अभिनयानंतर कुणाल आता दिग्दर्शनात पदार्पण करायला सज्ज झाला आहे.
एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटाद्वारे कुणाल दिग्दर्शनात क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचे शूटींग देखील पूर्ण झाले आहे, चित्रपटाच्या टायटलने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
एक्सेल एंटरटेनमेंटने, अनेक दशकांपासून आपल्या वेधक कथानकांसह नवी पातळी गाठली आहे.
Kunal Khemu ने शूटींग पूर्ण झाल्याची बातमी त्याच्या सोशल मिडियावरून दिली आहे. या फोटो मध्ये कुणालसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच कलाकारमंडळी देखील दिसून येत आहे.
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सह-स्थापित एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे फरहान अख्तरने २००१ मध्ये ‘दिल चाहता है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. एक्सेल एंटरटेनमेंटद्वाने आतापर्यंत ‘डॉन’, ‘डॉन 2’, ‘झेडएनएमडी’, ‘दिल चाहता है’ यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. सध्या एक्सेल एंटरटेनमेंट ‘जी ले जरा’ या आगामी सिनेमासाठी तयारी करत आहे.