गेल्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले. गेले काही दिवस सगळीकडेच कलाकारांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. २०२४ सुरु झाल्यापसून अनेक लग्न संपन्न झाले. प्रत्येकाच्या लग्नात काहीना काही खास होतच. पण सध्या सगळ्यात जास्त लग्नाची चर्चा झाली ती अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाची.
प्रथमेश आणि क्षितिजा यांनी क्षितिजाच्या गावी म्हणजे रत्नागिरी इथे अगदी जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अगदी मज्जा-मस्ती करत २४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मग त्यांची अंगठी असो त्यांचा डान्स असो, क्षितिजाने प्रथमेशसाठी घेतलेला उखाणा असो किंवा क्षितिजाने प्रथमेश साठी केलेल्या खास पोस्ट असोत या सगळ्याची भरपूर चर्चा झाली. त्यांच्या अंगठीमध्ये त्या दोघांच्या नावाचे पहिली अक्षरं आहेत. तर क्षितिजाच्या मंगळसुत्राने देखील सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होत. लग्नाचे सगळे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
View this post on Instagram
प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या लग्नातील प्रत्येक विधी आणि प्रत्येक गोष्ट व्हायरल झाली. लग्नानंतर गृहप्रवेश करताना क्षितिजाने प्रथमेशसाठी खूपच खास उखाणा घेतला. यामध्ये तिने प्रथमेशच्या सगळ्या सिनेमांची नावे घेतली त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट देखील केल्या. लग्नानंतर ते दोघे मुंबा देवीच्या दर्शनाला ही गेले.
तर आता लग्नानंतरच्या सत्यनारायण पूजेचे फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये प्रथमेशने शेवाळी रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतलेली दिसून येते. तर क्षितिजाने हिरव्या गार रंगाची साडी आणि त्यावर गुमाबी रंगाची शाल घेतली आहे. दोघांनी एकमेकांसोबत मॅचिंग असे पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. यावेळी प्रथमेशचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
त्याचबरोबर सध्या आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ म्हणजे लग्नानंतर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा. या व्हिडीओमध्ये प्रथमेश आणि क्षितिजा हे पाण्यात अंगठी शोधायचा खेळ खेळताना दिसून येतात. त्यानंतर प्रथमेश क्षितिजाच्या हातावरील मेहंदीमध्ये त्याचं नाव देखील शोधत आहे. ते दोघेही लग्न झाल्यावर लोणावळा येथील आंबी व्हेली इथे फिरायला गेले आहेत. याचे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पाहायला मिळाले.
हे देखील वाचा : ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या महाअंतिम सोहळ्यात अभिनेत्यांनी नेसल्या साड्या…