सध्याच्या घडीला सर्वत्र चर्चा आहे ती फक्त नि फक्त अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठक बाई आणि राणादा ची जोडी खूपच लोकप्रिय झाली होती इतकी की प्रेक्षकांना त्यांना खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील एकत्र पहायचे होते. अक्षया आणि हार्दिक ने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. तुम्हां सर्वाना माहितचं असेल की ते आता लग्नबंधनात अडकले आहेत. रील लाईफमध्ये सुरु झालेला अक्षया आणि हार्दिकचा प्रवास आता रियल लाईफमध्ये सुद्धा पुढे गेला आहे.
तर एक नजर फिरवूया अक्षया आणि हार्दिक यांच्या शुभविवाहाच्या कार्यक्रमांवर…
साखरपुडा
View this post on Instagram
अक्षया आणि हार्दिक या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३ मे २०२२ ला साखपुडा केला. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर साखरपुड्यानंतर ६ महिन्यांनी ते लग्न बंधनात अडकले आहेत.
केळवण
View this post on Instagram
हार्दिकने केळवणा चे फोटोज् शेअर करत त्यांची लग्नघटिका समीप आल्याचे संकेत चाहत्यांना दिले. हार्दीकचं केळवण त्याच्या बहिणीकडून सुरू झाले. अत्यंत साग्रसंगीत पद्धतीनं त्याच्या केळवणाचा शुभारंभ झाला.
ग्रहमख
View this post on Instagram
लग्न कार्याच्या शुभप्रसंगी आपल्या घरावर, नातेवाईकांवर, मित्रपरिवार कोणतेही संकट येऊ नये आणि शुभकार्य भंग होऊ नये यासाठी आपण नेहमीच देवाकडे साकडे घालतो. निसर्गातील सगळ्या संकटांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी सर्व ग्रहांची पूजा करत अक्षयाने ग्रहमख विधी पूर्ण केला.
मेहंदी
View this post on Instagram
मेहंदी चा तर काय वेगळाच थाट…. अक्षयाच्या आधी हार्दिकच्या #अहा या त्यांच्या लग्ना निमित्तच्या trending hashtag च्या मेहंदीची झलक समोर आली. त्यांनतर नवरी मुलगी अक्षयाने तिच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरु असतानाच्या सुंदर क्षणांचे काही फोटोज् आणि व्हिडिओज तिने शेअर केले. तर तिने तिच्या सुंदर मेहंदीमध्ये हार्दिकच्या नावासह त्यांच्या नात्यातील सप्त वचने देखील मेहंदी मध्ये कोरले आहे.
हळद
View this post on Instagram
अक्षया आणि हार्दिकच्या हळदीची मज्जाच काही और… अक्षया आणि हार्दिक यांचा हळदीचा सिंपल लूक सुद्धा चाहत्यांना भावला. हळदीचे फोटोज् आणि व्हिडिओज समोर आल्यावर दिसले की याप्रसंगी दोघीही मनसोक्त आणि बेभान होऊन नाचले. तसेच डोळ्यात अगदी सहज पाणी येईल या बाप लेकीच्या अतूट नात्यातील समोर आलेला हा क्षण पाहून प्रत्येकाचेच डोळे नक्कीच पाणावले असणार.
संगीत
View this post on Instagram
संगीत या कार्यक्रमात तर काय नुसता धिंगाणा…. हळदी नंतर लगेचच त्यांच्या संगीत लूकचे आणि कार्यक्रमाचे व्हिडिओज समोर आले. यावेळी पाठक बाई आणि राणादाच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकारांनी अक्षया आणि हार्दिक साठी एक खास डान्स सुद्धा केला, तसेच हार्दिकचा डान्स करतानाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी अक्षया आणि हार्दिक या गोड जोडीचा romantic अंदाज देखील पहायला मिळाला.
सप्तपदी/लग्न
View this post on Instagram
आता मात्र चाहत्यांची आतुरता संपली आहे कारण आपल्या reel लाइफ मधील जोडीने आज real लाइफ मध्ये देवाब्राम्हणांच्या साक्षीने आणि वडीलधाऱ्या माणसांच्या उपस्थितीत, प्रियाजनांच्या शुभेच्छांनी आणि एकमेकांच्या प्रेमाने ही लग्नगाठ बांधली आहे.
या सर्वांमध्ये न विसरता सांगावस वाटतं ते म्हणजे याप्रसंगी अक्षया आणि हार्दिकच मनमोहक रूप, खुलून आलेलं त्यांचं सौंदर्य आणि तो आनंद…. अशाप्रकारे आपल्या अक्षया आणि हार्दिकचा विवाह एकदम धूमधडाक्यात पार पडला.
अक्षया आणि हार्दिक यांना जीवनातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…