सध्या अमृता खानविलकर चर्चेत आहे ते तिच्या ‘लुटेरे’ या हिंदी वेब सीरिजमुळे! अमृता कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलंसं करत असते. आता ‘लुटेरे’सारखी वेब सीरिज करून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. येणाऱ्या काळात अमृता खानविलकर अनेक प्रोजेक्ट मधून दिसणार आहे.
हा पाडवा अमृतासाठी खास आहे कारण तिने सगळ्या मीडियामधल्या मित्रमंडळीसोबत हा पाडवा साजरा केला आहे. नेहमीच पत्रकार मित्र मैत्रिणी हे कामासाठी भेटत असताना त्यांच्यासाठी तिने खास पाडवा लंचचे आयोजन केलं होतं. यावेळी अमृताने काठापदराची साडी नाही तर गुलाबी आणि निळ्या रंगाचा काठापदराचा ड्रेस घातला होता. यावेळी तिने एकदम मराठमोळा लुक केला होता. केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा त्यावर चाफ्याची फुलं, नाकात नथ, यामध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिची आई देखील तिच्या सोबत उपस्थित होती.
‘लुटेरे’ नंतर अमृता अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे यात काही शंका नाही. अमृता लवकरच एक गुड न्यूज सुद्धा देणार आहे, पण ती गुड न्यूज सध्या गुलदस्त्यात असून ती काय असणार हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.