‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील फेमस अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ हिने मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ती एक अभिनेत्री तर आहेच पण त्याच बरोबर ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
अमृताच्या चंद्रमुखी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओमध्ये अमृताने ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉरमिंग आर्टस’च्या भव्य सभागृहात सादर केलेल्या नृत्याची एक झलक आहे.
पोस्ट शेअर करत अमृताने लिहिले की, “आयुष्यात अशा संधी मिळाल्या की, फारच छान आणि कृतज्ञ वाटते. कधी कधी तो आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. मी माझ्या आयुष्यात पहिले कथक नृत्य ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सादर केले. यावेळी मला ७५ नृत्यागणांनी साथ दिली. पियुषराज आणि शुभदा यांचे या नव्या प्रवासासाठी मनापासून आभार…माझ्या गुरुंनी आठवडाभर मला जी शिकवण दिली त्यामुळे मी खरंच भारावून गेले. मला समजून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद…हा नक्कीच माझ्या नृत्य विश्वातील नवा शुभारंभ होता.”
View this post on Instagram
तिने या पोस्ट मध्ये तिला कथक नृत्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले अश्या गुरूंचे आभार मानले आहे. नंदिता पाटकर यांनी या व्हिडीओवर कमेंट करत अमृताचे खास कौतुक केले. तसेच नेटकऱ्यांनी सुद्धा तिचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रा या जबरदस्त भूमिकेनंतर लवकरच अमृता धावपट्टू ‘ललिता बाबर’ यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती कलावती या सिनेमातून देखील पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी देखील तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून सर्वांची मनं जिंकली. तीचं नृत्यावर असलेल प्रेम देखील सर्वांना माहिती आहे.