पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ‘अंकिता लोखंडे.’ पण आता पवित्र रिश्तानंतर बिग बॉसच्या १७ व्या सिझनमुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.
बिग बॉसच्या १७ व्या सिझनमध्ये पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी या शोची कपल विरुद्ध सिंगल अशी थीम असल्यामुळे अंकिता तिचा पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात आली आहे. घरात आल्यापासूनच काही ना काही कारणामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे.
घरातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. त्यापैकी अंकिता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. कधी तिच्या कपड्यांवरून तर कधी तिच्या आणि विकीच्या खुल्लमखुल्ला प्रेमामुळे अंकिताच्या चर्चांना उधाण आले. आता पुन्हा एकदा अंकिता अशाच काहीशा कारणांमुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी सोशल मिडीयावरून अंकिता आणि विकी किती परफेक्ट कपल आहेत हे सर्वांनीच पाहिलं.
परंतू आता या रिॲलिटी शोमधून अंकिता आणि विकीचे उडणारे खटके पाहून त्यांना अनेकजण ट्रोल करत आहेत. दिवसाला अंकिता आणि विकीचे होणारे भांडण, त्यांची एकमेकांवर रागवण्याची पद्धत, त्यात होणारा त्यांचा अपमान हे सारे पाहून कपल म्हणून खूपच वेगळ्या पद्धतीने ते आता त्यांच्या चाहत्यांच्या समोर येत आहेत. या शोमध्ये विकी अंकिताला सुनावताना म्हणतो की, “आयुष्यात तू मला काहीच देऊ शकलीस नाहीस, तर किमान शांतता तरी दे.” असं मोठं विधान विकीने केल्यामुळे अंकिताचे चाहते विकीवर चांगलेच भडकले आहेत.
View this post on Instagram
तसेच मागील काही दिवसात “तू एकटाच पुढे जात आहे, मी मात्र मागे पडली आहे.” अंकिताने विकीकडे अशी खंत व्यक्त केली. त्यावर सलमानने तिला चांगलच सुनवलं. तेव्हा तो अंकिताला म्हणाला की, “तू बिग बॉसमध्ये तुझी वेगळी ओळख गमवायला आली आहेस का? तू तुझा पती विकीसोबत इथे येण्याचा निर्णय घेतलास आणि तुझा पती दुसऱ्यांनाच तुझ्याशी भांडायला सांगतोय.” त्यामुळे विकी आणि अंकिता यांच्या नात्यात नक्की चाललंय तरी काय? तसेच पुढे जाऊन आणखी काय काय पाहायला मिळणार याकडेच चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.