२०१३ साली संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘रामलीला’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात दीपिका व रणवीर मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली व त्यानंतर त्यांनी २०१५ साली त्यांनी गुपचूप साखरपुडा देखील उरकला होता.
दीपिका व रणवीर ही बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी तिथे काही खासगी तर काही करिअर संबंधित गोष्टी शेअर केल्या. यादरम्यानचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
संजय लीला भन्साळी यांचा रामलीला हा सिनेमा सुपरहिट ठरला. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या सिनेमासाठी पहिली पसंती दीपिका नसून बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूर ही होती. रामलीला या सिनेमासाठी रणवीर व करीना एकत्र स्क्रिन शेअर करणार होते. सुरुवातीला करीना देखील हा सिनेमा करण्यासाठी तयार होती.
रणवीरने सांगितले की, “सिनेमाचं सेट तयार होतं. सर्वजण शूटिंग सुरु करण्याची तयारी करत होते. पण शूटिंगच्या एक आठवडा आधीच करीनाने रामलीला सिनेमा सोडला. त्यानंतर संजय लीला भन्साळी हे करीनाची रिप्लेसमेंट शोधत होते त्याचदरम्यान दीपिकाचा कॉकटेल सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमातील रणवीरने तिचं काम पाहिलं होत, त्यावेळी रणवीरने दीपिकाचं नाव सुचवलं होतं. भन्साळी यांनीही यावर होकार दर्शवला. दीपिकाने ऑडिशन दिलं, त्यात ती पास झाली आणि अशी तिची रामलीला सिनेमात एंट्री झाली होती.
दरम्यान, करीनाने स्वतःही हा चित्रपट का सोडला याबाबत एकदा सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणाली होती की, “मी मान्य करते की मी वेडी आहे. अनेक वेळा मी चित्रपट साइन करते आणि नंतर मला वाटलं की ते चुकीचे आहे. होय, मी राम-लीला करणार होते पण मी माझा विचार बदलला. मी ‘गोरी तेरे प्यार मे’ हा चित्रपट करायचं ठरवलं. खरं तर सगळं माझ्या मूडवर असतं. पण मला चित्रपट सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही.”