नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते मॅथ्यू पेरीचे निधन झाले आहे. मॅथ्यू पेरी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
लास वेगास येथील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मिडियावरून याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अजूनही समोर आलेले नाही. नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त करत आहेत.
मॅथ्यू पेरी यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ रोजी विल्यमस्टाउन येथे झाला असून ‘चार्ल्स इन चार्ज’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच त्यांनी ‘बेव्हरली हिल्स 90210’ आणि ‘अ नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रीअर्डन’ मध्ये देखील काम केले. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे त्यांची लोकप्रिय मालिका ‘फ्रेंड्स‘ मधून. ही मालिका २२ सप्टेंबर १९९४ रोजी सुरू झाली व ६ मे २००४ रोजी संपली. या मालिकेचे १० सीजन आले असून ही मालिका तब्बल दहा वर्ष चालली. या मालिकेत त्यांनी चँडलरची भूमिका साकारली होती. फ्रेंड्स मालिकेतून जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अवलियाला भावपूर्ण श्रद्धांजली.