२०१६ मध्ये संपूर्ण जगभरात गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. तसेच नागराज मंजुळे यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टीला अनेक नवोदित कलाकार मिळाले.
त्यापैकी सर्वात लक्षवेधी कलाकार म्हणजे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु. सामान्य माणूस ते एका सिनेमामुळे रातोरात झालेले स्टार आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत. सैराट नंतर त्या दोघांनी अनेक सिनेमे आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
तर सध्या रिंकू प्रचंड चर्चेत आली आहे. तिच्या चर्चांचे कारण म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर सोबतचा व्हायरल होणारा तो फोटो. इतर कलाकारांप्रमाणे ललित देखील सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. ती कायमच त्याच्या चाहत्यांसोबत त्याच्या अनेक खासगी आणि व्यवहारिक आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो. नुकतच ललितने इंस्टाग्रामवरून एक स्टोरी टाकली होती.
या स्टोरीमध्ये त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या सोबत एक मुलगी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी आहे. परंतू या फोटोमध्ये असणाऱ्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी ती मुलगी म्हणजे रिंकू असल्याचा दावा अनेकांनी केला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर रिंकू आणि ललितच्या रिलेशनशिपबद्दलचा चर्चांना उधाण आले आहे.
तर फोटो शेअर करत “Big News, Stay Tuned” असे ललितने कॅप्शन ही लिहिले. त्यामुळे अनेकांनी त्या दोघांचे नाव जोडले आहे. परंतू तसे काहीही नाही. ललित आणि रिंकू लवकरच एकत्र दिसणार आहे. त्यामुळे त्यांचा हा फोटो त्यांच्या नवीन प्रोजेक्ट दरम्यानचा आहे यावर शिक्कमोर्तब झाला आहे.
खिल्लार या सिनेमातून रिंकू आणि ललित यांची ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानेच काही दिवसांपूर्वी ते दोघेही मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.